(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राप्रमाणे मुसलमानही इस्लामी राष्ट्राची मागणी करू लागले तर . . ?’ – मौलाना तौकीर रझा
|
रामपूर (उत्तरप्रदेश) – जर हिंदु राष्ट्राची मागणी योग्य आहे, तर खलिस्तानची मागणी करणार्यांचीही मागणी योग्य आहे. त्यांची बाजू घेतली, तर आमचे मुसलमान तरुण उभे रहातील आणि त्यांनी इस्लामी राष्ट्राची मागणी केली, तर काय होईल ? यासाठी आपल्याला देशाची आणखी एक फाळणी होऊ देऊ नये, असे विधान इत्तेहाद मिल्लत कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना (इस्लामचे धार्मिक नेते) तौकीर रझा यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. मुरादाबादमध्ये हिंदु राष्ट्राची मागणी करणार्यांच्या विरोधात बोलतांना त्यांनी हे विधान केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘धृतराष्ट्र’ असेही म्हटले. ‘विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल या आतंकवादी संघटना आहेत’, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.
१. मौलाना रझा पुढे म्हणाले की, ज्या प्रमाणे खलिस्तानची मागणी करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून कारवाई केली जात आहे, तशीच कारवाई हिंदु राष्ट्राची मागणी करणार्यांवर करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा असे समजले जाईल की, हिंदु राष्ट्राची मागणी करणार्यांवर कारवाई होत नाही, तर खलिस्तानची मागणी करणे योग्य आहे.
२. मौलाना रझा यांनी आरोप केला की, नरेंद्र मोदी सरकार सातत्याने मुसलमान आणि इस्लाम यांच्या शत्रूंची पाठ थोपटत आहेत.
३. मोदी सरकार त्यांचीच पाठ थोपटतात, जे इस्लामचे शत्रू आहेत. ते आमचा आवाज ऐकणार नसल्याने राष्ट्रपतींनी आमचा आवाज ऐकावा, असेही रझा या वेळी म्हणाले.
(म्हणे) ‘१० लाख मुसलमान तरुणींचे हिंदु संघटनांकडून अपहरण करून धर्मांतर !’
मौलाना तौकीर रझा यांनी दावा केला की, एका सर्वेक्षणानुसार सुमारे १० लाख मुसलमान तरुणींचे हिंदु संघटनांनी अपहरण करून धमकावरून धर्मांतर केले आहे. याला त्यांनी घरवापसी असे नाव दिले आहे. ते या तरुणींचे हिंदु तरुणांशी विवाहही करवून दिले आहे. यामुळे त्यांनी हिंदु धर्माची हानी केली आहे.
मुसलमान नाही, तर आता सत्तेत असणारे बाँब फोडत होते !
रझा यांनी आरोप करतांना म्हटले की, मुसलमान पूर्वीही बाँब फोडत नव्हता आणि आजही फोडत नाही. जे बाँब फोडत होते ते हिंदु समाजाची दिशाभूल करत होते की, ‘मुसलमान बाँब फोडतात.’ खरे तर हेच लोक बाँब फोडत होते जे आज सरकारमध्ये बसले आहेत. देशात आता दंगली होत नाहीत कारण दंगल करणारे सत्तेत आहेत. (अशा प्रकारचे हास्यास्पद आरोप करून रझा धर्मांध आणि जिहादी लोकांना पाठीशी घालत आहेत. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे ! – संपादक)
‘मुस्लिम भी इस्लामी मुल्क की माँग करेंगे’: मौलाना तौकीर रज़ा ने ‘हिन्दू राष्ट्र’ का किया विरोध, फारूक अब्दुल्ला बोले – 24 करोड़ मुस्लिमों को समुद्र में फेंकोगे?#HinduRashtra #IslamicState #FarooqAbdullah #TauqeerRaza https://t.co/CFg37pQsMt
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 12, 2023
संपादकीय भूमिका
|