किशनगंज (बिहार) येथे आग लागल्याने मंदिर जळून खाक !
आग अज्ञातांकडून लावण्यात आल्याचा गावकर्यांचा आरोप
किशनगंज (बिहार) – बगलबाडी गावातील पंचायत मस्तान चौकामधील श्री हनुमान मंदिराला आग लागली. यात देवतांच्या मूर्तींसह मंदिर जळून खाक झाले. मंदिरात असणारे शिवलिंग आणि अन्य मूर्ती यांची हानी झाली आहे. या आगीमध्ये मंदिराशेजारील ३ मंदिरेही जळून खाक झाली. मंदिराच्या भिंतीची हानी झाली आहे. स्थानिक गावकरी आणि पोलीस यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. गावकर्यांना संशय आहे की, मंदिराची तोडफोड करून त्यास आग लावण्यात आली. यामुळे त्यांनी येथे निदर्शने करून ‘रस्ता बंद’ आंदोलन करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यासह सरकारी खर्चाने मंदिराचे पुनर्निर्माण करावे, मूर्तीची स्थापन करावी, मंदिरात सीसीटीव्ही लावावा आदी मागण्याही केल्या.
संपादकीय भूमिकापोलिसांनी या घटनेची योग्य चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे ! |