अंधेरी (मुंबई) येथे पोलंडहून आलेल्या महिलेवर बलात्कार !
समाजात वासनांधतेने गाठलेली परिसीमा !
गेल्या ७ वर्षांपासून लैंगिक अत्याचार
अंधेरी (मुंबई) – येथे पोलंडहून आलेल्या एका महिलेवर बलात्कार झाला असून या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ‘एशियन बिझनेस एक्झिबिशन्स अँड कॉन्फरन्स लि.’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आरोपी मनीष गांधी याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्याने नोव्हेंबर २०१६ ते २०२२ या कालावधीत अनेकदा बलात्कार आणि लैंगिक शोषण केले असून धमकावलेही आहे’, असे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले.
A 34-year-old Polish national has filed a rape case against Manish Gandhi, the chief operating officer and executive director of Asian Business Exhibitions and Conferences (ABEC), a company based in Andheri
(Reports @Brezzy_Drive)https://t.co/r23ACuplwr
— HTMumbai (@HTMumbai) March 12, 2023
आरोपी मनीष याने महिलेचे नाव वापरून अश्लील कथा रचून व्हिडिओ सिद्ध केला होता. त्याने शारिरीक आणि मानसिक त्रासही दिला. जर्मनी, गोरेगाव, देहली आणि अन्य ठिकाणी नेऊन छायाचित्रेही काढली. ही महिला नोकरीसाठी भारतात आली होती. नोकरी देण्याच्या आमीषाने त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्रासामुळे तिने तिच्या मायदेशी परत जाण्याचाही निर्णय घेतला; परंतु त्याने तिच्याकडील सर्व आवश्यक कागदपत्रे काढून घेतल्याने ती परत जाऊ शकली नाही.