गोवा : उष्णतेच्या लाटेसंदर्भात शासनाकडून सूचना !
पणजी (स.प.) – राज्यातील तापमानात वाढ होत असल्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांसाठी प्रतिबंधात्मक सूचना जारी केल्या आहेत.
काय करावे ? √√√
१. हवामानाची माहिती मिळण्यासाठी रेडिओ, दूरचित्रवाहिन्या, मोबाईल ॲप यांचा वापर करा.
२. भरपूर पाणी प्या. तहान लागली नसेल, तरीही मधे मधे पाणी पित रहा.
३. शक्यतो सुती कपडे वापरावेत. घराबाहेर पडतांना टोपी, गॉगल आणि छत्री यांचा वापर करा.
४. कामासाठी बाहेर पडावे लागत असल्यास टोपी, छत्री यांसह डोके, मान, चेहरा, तसेच हात-पायांवर ओलसर कापड ठेवत रहावे.
५. आहारात लिंबू सरबत, ताक, कोकम सरबत यांचा आवर्जून समावेश करावा.
६. पाळीव प्राण्यांना सावलीत बांधा, तसेच त्यांच्यासाठी मुबलक पाण्याची सोय करा.
काय करू नये ? ×××
१. शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे.
२. वाहनतळात लावलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका.
३. गडद, जड किंवा घट्ट कपडे घालणे टाळा.
४. मद्य, चहा, कॉफी आणि शरिराचे निर्जलीकरण (डिहायड्रेशन) करणारे कार्बोनेटेड शीतपेये टाळा.
५. अधिक प्रथिने, खारट, मसालेदार आणि तेलकट पदार्थ टाळा. शिळे अन्न खाऊ नका.