कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील दोघांना ८ लाख रुपयांची लाच घेतांना अटक !
कोल्हापूर – शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे आणि हवालदार रूपेश कुंभार या दाेघांना सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ लाख रुपयांची लाच घेतांना अटक केली आहे. या संदर्भात सांगली येथील तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली होती. प्रत्येक मासात कोल्हापूर जिल्ह्यात पोलीसदलातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांपासून हवालदारापर्यंत एकतरी संशयित लाच घेतांना सापडत असल्याने पोलीसदलाची नाचक्की होत आहे.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचारग्रस्त पोलीस प्रशासन हे जनतेसाठी घातकच ! अशा पोलिसांना कठोर शिक्षाच हवी ! |