हिंदूहितासाठी हिंदूंना जागृत करण्यासाठी विविध ठिकाणी आंदोलन करणे आवश्यक ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास आणि संस्कृती अभ्यासक तथा लेखक
‘बांगलादेश वर्ष १९७१ मध्ये स्वतंत्र झाला; मात्र तेथील हिंदूंसाठी आपण काय केले ? तेथील हिंदू कुठल्या अवस्थेत जगत आहेत ? याविषयी भारतातील हिंदूंना काही देणे-घेणे नाही. गेल्याच आठवड्यात बांगलादेशमध्ये हिंदूंची १४ मंदिरे तोडण्यात आली. याविषयी भारताकडून काहीच प्रतिक्रिया दिली गेली नाही. हिंदू जागृत नसल्याने जगभरात अनेक ठिकाणी हिंदूंवर अत्याचार होत असतांनाही त्याविषयी काहीच आवाज उठवला जात नाही. हिंदूहितासाठी दुसरे कुणीतरी कार्य करील, यावर अवलंबून न रहाता हिंदूंना जागृत करण्यासाठी गावागावांत आणि शहरांत आंदोलने झाली पाहिजेत, तर कुठेतरी बांगलादेश किंवा अन्यत्र कुठेही हिंदूंवर अत्याचार झाल्यास त्याविषयी कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण होईल.’ (१३.२.२०२३)