इंदूर (मध्यप्रदेश) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर दिलेले अभिप्राय
सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या इंदूर येथील भक्तांचे ८ मार्च या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले. या वेळी त्यांनी आश्रमातील अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांचे, तसेच आध्यात्मिक संशोधनाचे कार्य जाणून घेतले.
प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाविषयी दिलेले सामायिक अभिप्राय१. ‘रामनाथी आश्रम पाहून आम्हाला पुष्कळ आनंद झाला. २. आश्रमातील शिस्त आणि नीटनेटकेपणा आमच्या मनाला भावला. ३. येथे आम्हाला सर्वत्र सात्त्विकता आणि चैतन्य जाणवले. ४. येथे आम्हाला प्रसन्नता आणि आपलेपणा जाणवला. ५. साधकांकडून ‘सेवाभाव कसा असावा ?’, हे आम्हाला शिकायला मिळाले. ६. येथे आम्हाला प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवले.’ – प.पू. भक्तराज महाराज यांचे सर्व भक्त (८ आणि ९.३.२०२३) |
१. सौ. सुरेखा अशोक भांड, इंदूर
अ. ‘आश्रमात सर्वत्र सात्त्विकता, आध्यात्मिक वातावरण आणि चैतन्य जाणवले.
२. श्री. अशोक भांड, इंदूर
अ. ‘आश्रमात चैतन्यपूर्ण भाव प्रगट झाले आहेत.
आ. आश्रमात प्रत्यक्ष बाबांची (प.पू. भक्तराज महाराज यांची) उपस्थिती जाणवली.’
३. श्री. अनिल गोगटे, इंदूर
अ. ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रेरणेने प.पू. आठवलेजींनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) उभारलेल्या या धर्मप्रसाराचे, म्हणजे सनातन धर्माचे (हिंदुत्वाचे) कार्य पुष्कळ अद्भुत आहे आणि जनजागृतीकरता महत्त्वपूर्ण आहे.’
४. सौ. अर्चना गोगटे, इंदूर
अ. ‘आश्रमात आल्यानंतर साक्षात् सेवाभाव, सात्त्विकता, चैतन्य आणि ‘गुरूंविषयी समर्पण भाव कसा असावा ?’, यांचा अनुभव घ्यायला मिळाला अन् ‘त्यातूनही आम्ही शिकायचा प्रयत्न करायला हवा’, हे प्रकर्षाने जाणवले.’
५. श्री. अरुण दत्तात्रय अभ्यंकर, इंदूर
अ. ‘पुष्कळ छान वाटले.
आ. प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंददादा (प.पू. रामानंद महाराज) यांच्या आशीर्वादाची प्रत्यक्ष फलश्रुती अन् प.पू. डॉ. आठवलेकाकांचा पुरुषार्थ पाहून पुष्कळ आनंद झाला.’
६. सौ. नयना लोणकर, इंदूर
अ. ‘आश्रमात आल्यावर असे वाटले की, ‘आज आपण स्वर्गलोकात सर्व देवीदेवतांच्या समवेत आहोत.’
आ. आश्रमातील वातावरण फारच शुद्ध आणि सात्त्विक वाटले.
इ. सगळ्या भक्तांमध्ये (साधकांमध्ये) सर्व संतांचे दर्शन झाले.’
७. श्री. प्रकाशचंद्र लोणकर, इंदूर
अ. ‘आश्रम पाहून जीवनातील अविस्मरणीय क्षण एकत्र आले’, असे वाटले.
आ. पूर्ण आश्रमात प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉक्टरसाहेब (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांची अनुभूती होते. (अस्तित्व जाणवते.)
८. श्री. अनिल वामन जोग, इंदूर
अ. ‘प.पू. बाबांच्या आशीर्वादाने आणि कृपेने आश्रमात सर्व व्यवस्थित चालू आहे. एकदा मी प.पू. बाबांच्या खोलीत असतांना प.पू. बाबा कुशीवर झोपले होते. ते मध्येच एकदम उठून टिळकांसारखा (लोकमान्य टिळक यांच्यासारखा) हात वर करून ‘सनातन मी चालवीन’, असे म्हणाले होते. त्याची प्रत्यक्ष प्रचीती आली.’
९. सौ. रेखा अभ्यंकर, इंदूर
अ. ‘आश्रम पाहून नामस्मरणाची इच्छा झाली.
आ. आश्रमातील शिस्त आणि नीटनेटकेपणा पाहून ‘आम्ही त्यापासून शिकवण कशी घ्यावी ?’, ते शिकलो.
इ. ‘विचारांचा आणि शब्दांचा गोडवा कसा ठेवावा ?’, ते समजले.’
१०. सौ. चित्रा विजय मेंढे (प.पू. रामानंद महाराज यांची मुलगी), इंदूर
अ. ‘रामनाथी आश्रम पाहून आनंद झाला. त्याचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. ‘प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) येथे आहेतच’, असे वाटले.’
११. श्री. विजय मार्तंड मेंढे (प.पू. रामानंद महाराज यांचे जावई), इंदूर
अ. ‘रामनाथी आश्रमात येऊन शांती मिळून वेगळीच उर्जा मिळाली.
आ. आश्रमदर्शन करतांना ज्या अनुभूती आल्या, त्यांचे वर्णनच करू शकत नाही.’
१२. श्री. शरद रामकृष्ण बापट, इंदूर
अ. ‘रामनाथी आश्रम पाहून मी भारावून गेलो.
आ. एक उत्कृष्ट व्यवस्थापन पहायला मिळाले.’
१३. सौ. सुप्रिया शरद बापट, इंदूर
अ. ‘रामनाथी आश्रमात प्रचंड प्रमाणात सुनियोजन आणि सेवा पाहून अत्यंत आनंद झाला.’
१४. श्री. लोकेश (राजू) निरगुडकर (प.पू. रामानंद महाराज यांचे सुपुत्र), इंदूर
अ. साधकांतील नम्रपणा पाहून पुष्कळच छान वाटते आणि शिकायलाही मिळते.’
१५. श्री. शामराज (संजू) घळसासी, इंदूर
अ. ‘आश्रम पाहून मी अंतर्मुख झालो.’
१६. श्री. दीपक बिडवई (प.पू. अच्युतानंद महाराज, इंदूर यांचे चिरंजीव)
अ. ‘रामनाथी आश्रमात सर्वत्र सात्त्विकता, चैतन्य, आनंद आणि शांतता जाणवते.’
(सर्व अभिप्रायांचा दिनांक : ९.३.२०२३)
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून दिलेले अभिप्राय
१. श्री. प्रकाशचंद्र लोणकर, इंदूर
अ. ‘जीवनात काय चुका होतात आणि त्या चुका न होण्यासाठी कसे प्रयत्न करायचे’, याची जाणीव हे प्रदर्शन पाहून झाली.’
२. सौ. शिल्पा निरगुडकर, इंदूर
अ. ‘सूक्ष्म जगाविषयी ऐकले होते; पण येथे ते बारकाईने पहाता आले. त्याविषयी जिज्ञासा निर्माण झाली.
आ. ‘सूक्ष्म जगाचा प्रभाव आपल्या जीवनावर होतो’, हे लक्षात आले.’
चूक आणि सुधारणा११.३.२०२३ या दिवशीच्या दैनिकात पृष्ठ ६ वर ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर दिलेले अभिप्राय’ या लेखामध्ये ‘श्री. गिरीष गणेश दीक्षित (इंदूर येथील भक्तवात्सल्याश्रमाचे विश्वस्त आणि कोषाध्यक्ष), नाशिक’ असे चुकीचे प्रसिद्ध झाले आहे. यात श्री. गिरीष गणेश दीक्षित हे इंदूर येथील भक्तवात्सल्याश्रमाचे विश्वस्त आहेत, तर श्री. विजय मेंढे (प.पू. रामानंद महाराज यांचे जावई) हे कोषाध्यक्ष आहेत. या चुकीसाठी क्षमस्व ! उत्तरदायी कार्यकर्ते या चुकीसाठी प्रायश्चित्त घेत आहेत. – संपादक |
प.पू. भक्तराज महाराज यांनी शिष्याचा अहंकार घालवणे१९९२ ची गुरुपौर्णिमा मुंबईला होती. तिच्या सिद्धतेविषयी बाबा अधूनमधून विचारायचे, ‘‘काही अधिक-उणे हवे का ?’’ तेव्हा मी (डॉ. जयंत आठवले) बाबांना (प.पू. भक्तराज महाराज यांना) सांगायचो, ‘‘आम्ही सर्व नीट करू. काही काळजी करू नका !’’ ‘आम्ही पैसे गोळा करून गुरुपौर्णिमा चांगल्या प्रकारे साजरी करू’, असा भाव त्यात असे. पुढे ‘‘इंदूरच्या आश्रमाच्या बांधकामासाठी पैसे हवे आहेत’’, असे बाबांनी सांगितल्यावर आम्ही गुरुपौर्णिमेसाठी गोळा केलेले सर्व पैसे बाबांना दिले. नंतर परत पैसे गोळा केल्यावर ‘‘गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा म्हणून मला देणार असलेल्या पैशांपैकी काही कांदळी आश्रमात विहीर खणण्यासाठी द्या’’, असे बाबांनी सांगितल्यावर त्यांना ते दिले. गोळा केलेले पैसे परत दिल्यामुळे ‘आता गुरुपौर्णिमा कशी साजरी करता येईल’, ही काळजी मनात निर्माण झाली, मग जाणीव झाली, ‘गुरुपौर्णिमा आम्ही करू’ हा अहंभाव नाहीसा करण्यासाठी बाबांनी हे सर्व केले. तेव्हापासून काळजीही गेली आणि पुढची कामेही आपोआप होत गेली. (संदर्भ : सनातनची ग्रंथमालिका ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’ खंड तिसरा ‘साधनेविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन’) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |