पुरुषांच्या डोक्यावरील केसांमध्ये भोवरे असणे आणि स्त्रियांच्या डोक्यावरील केसांमध्ये भोवरे नसणे यांमागील अध्यात्मशास्त्र अन् श्री. राम होनप यांना मिळालेल्या सूक्ष्मातील ज्ञानाची प्रक्रिया
१. पुरुषांच्या डोक्यावरील केसांमध्ये भोवरे निर्माण होण्यामागील अध्यात्मशास्त्र
‘पुरुषांच्या डोक्यावरील केसांमध्ये भोवरे निर्माण होण्यापूर्वी टप्प्याटप्प्याने घडणारी सूक्ष्म प्रक्रिया पुढे दिली आहे.
१ अ. गर्भाचे चित्त जागृत अवस्थेत आल्यावर त्याच्यातील गत जन्मांतील संस्कारामुळे ‘मी कुठे आहे ? येथून बाहेर कसे पडायचे ?’, या सूक्ष्म संवेदना कार्य करू लागणे आणि त्यानुरूप त्याच्यातील शक्तीद्वारे गर्भाच्या मस्तकाच्या निर्मितीच्या कार्यास प्रारंभ होणे : स्त्रीच्या गर्भाशयात पुरुष-गर्भाची वाढ होण्यास प्रारंभ होते, तेव्हा पहिला मास गर्भाचे चित्त सुप्त स्वरूपात असते. त्यानंतर ते हळूहळू जागृत अवस्थेत येऊ लागते. गर्भाच्या चित्तावर गेल्या अनेक जन्मांचे विविध संस्कार असतात. त्यानुरूप त्याच्या चित्तात पुढील सूक्ष्म संवेदना जागृत होतात, ‘मी कुठे आहे ? येथून बाहेर कसे पडायचे ?’ चित्तातील सूक्ष्म संवेदनांमुळे गर्भातील शक्ती कार्य करू लागते. परिणामी गर्भात अन्य अवयवांच्या समवेत मस्तकाची निर्मिती होण्यास प्रारंभ होतो. गर्भाचे प्रथम अंतर्मन आणि त्यानंतर काही काळाने बाह्यमन जागृत अवस्थेत येते.
१ आ. गर्भातील बहुतेक शक्ती वरच्या दिशेने प्रवाहित होऊन त्यातून अतिशय सूक्ष्म असा ‘मेंदू’ आणि ‘मस्तक’ यांची निर्मिती होणे : गर्भाच्या चित्तातील ‘मी कुठे आहे ? येथून बाहेर कसे पडायचे ?’, या सूक्ष्म संवेदना अधिक तीव्र होऊ लागतात, तेव्हा चित्ताला या सूक्ष्म संवेदनांना योग्य मार्ग दाखवण्यार्या साथीदाराची, म्हणजे बुद्धीची आवश्यकता भासते. तेव्हा गर्भातील बहुतेक शक्ती वरच्या दिशेने, म्हणजे उर्ध्वगामी प्रवाहित होते. त्यातून अतिशय सूक्ष्म असा मेंदू आणि मस्तक यांची निर्मिती होते. शरिरातील अन्य अवयवांच्या तुलनेत ‘मेंदू’ सिद्ध होण्यासाठी गर्भातील मोठ्या शक्तीचा व्यय होतो.
१ इ. गर्भाचे मस्तक सिद्ध होतांना शक्तीची भोवर्याप्रमाणे गतीमानता आणि तिचे सामर्थ्य यांचा एकत्रित परिणाम मस्तकाशी संबंधित पेशींवर झाल्याने तेथे भोवर्यांचा आकार सिद्ध होणे : गर्भातील शक्तीद्वारे मस्तक सिद्ध करण्याचे कार्य पूर्ण होते, तेव्हा ती शक्ती अन्य अवयांच्या निर्मितीसाठी वरून खालच्या दिशेने, म्हणजे अधोगामी प्रवाहित होते. ही प्रक्रिया घडतांना मस्तकात शक्तीची भोवर्याप्रमाणे गतीमानता आणि सामर्थ्य यांचा एकत्रित प्रभाव मस्तकाशी संबंधित पेशींवर पडतो. त्याचा परिणामस्वरूप मस्तकावर भोवर्यांच्या आकाराची निर्मिती होते.
२. स्त्रियांच्या डोक्यावरील केसांमध्ये भोवरे नसण्यामागील अध्यात्मशास्त्र
स्त्री-गर्भाची मस्तकाच्या निर्मितीसाठी घडणारी सूक्ष्म प्रक्रिया वर दिलेल्या पुरुष गर्भाप्रमाणेच असते. स्त्री- गर्भातील शक्तीचे मस्तक सिद्ध करण्याचे कार्य पूर्ण होते, तेव्हा ती अन्य अवयांच्या निर्मितीसाठी वरून खालच्या दिशेने, म्हणजे अधोगामी होते. ही प्रक्रिया घडतांना मस्तकात शक्तीची भोवर्याप्रमाणे गतीमानता असते; परंतु शक्तीची गतीमानता आणि तिचे सामर्थ्य हे पुरुष-गर्भाच्या तुलनेत अल्प असते. त्यामुळे स्त्रीचे मस्तक सिद्ध होतांना तेथील पेशींवर शक्तीचा परिणाम न झाल्याने तिच्या डोक्यावर पुरुषांप्रमाणे भोवर्यांची निर्मिती होत नाही.
३. श्री. राम होनप यांना मिळालेल्या सूक्ष्मातील ज्ञानाची प्रक्रिया
२४.११.२०२१ या दिवशी सकाळी स्नानाला जाण्यापूर्वी माझ्या मनात पुढील प्रश्न आला, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विचारलेल्या ‘पुरुषांच्या डोक्यावरील केसांमध्ये भोवरे असण्यामागील आणि स्त्रियांच्या डोक्यावरील केसांमध्ये भोवरे नसण्यामागील अध्यात्मशास्त्र काय असेल ?’ स्नान करतांना मला वरील विषयासंबंधी सूक्ष्मातील ज्ञान प्राप्त झाले आणि स्नानानंतर वरील सूत्रांची नोंदवहीत मी नोंद केली.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.११.२०२१)
|