पी.एफ्.आय.ला संयुक्त अरब अमिरातमधून करण्यात येत होता अर्थपुरवठा !
या पैशांतून दारूगोळा आणि शस्त्र खरेदी होणार होती !
नवी देहली – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या बंदी घातलेल्या जिहादी संघटनेला विदेशातून कोट्यवधी रुपयांचा पुरवठा झाल्याची माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने ) दिली. संयुक्त अरब अमिरात येथून हे पैसे पाठवण्यात आले. हे पैसे विविध राज्यांतील कार्यकर्त्यांना वाटण्यात आले होते. या प्रकरणी एन्.आय.ए.ने कर्नाटक आणि केरळ येथून ५ जणांना अटक केली आहे. या ५ जणांना बिहारमधील फुलवारी शरीफ येथील बाँबस्फोटांच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यात कर्नाटकातील महंमद सिन्नान, सरफराज नवाज, इक्बाल, अब्दुल रफीक आणि केरळचा आबिद यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्या बँक खात्यांच्या तपासणीतून पैशांची देवाण-घेवाण झाल्याची माहिती मिळाली आहे.
#PFI #terrorfunding case: #NIA busts multi-state hawala network, 5 arrested
PFI was declared as an “unlawful association’ under the Unlawful Activities (Prevention) Act on September 27 last year.https://t.co/N7XxhViQoi
— The Times Of India (@timesofindia) March 7, 2023
एन्.आय.ए.ने म्हटले आहे की, संयुक्त अरब अमिरातमधून आलेल्या पैशांचा उपयोग दारूगोळा आणि शस्त्रे खरेदी करण्यासाठी होणार होता. हे पैसे अटकेतील आरोपी सरफराज आणि महंमद सिन्नान यांच्या खात्यात हवालाच्या माध्यमातून पाठवण्यात आले होते. इक्बाल आणि त्याच्या साथीदारंनी दुबईतून पैसे गोळा केले होते.
संपादकीय भूमिकाजिहादी आतंकवाद्यांना इस्लामी देशांतून अर्थपुरवठा होतो, हे आता उघड झाले आहे. भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचाच हा प्रयत्न आहे. हे रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे ! |