सौदी अरेबियामध्ये रमझानच्या काळात मशिदींवरील ध्वनीक्षेपकांवर बंदी !
इफ्तार पार्ट्यांवरही बंदी !
रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियाने येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार्या रमझान मासाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध घातले आहेत. यानुसार मशिदींवरील ध्वनीक्षेपक, तसेच इफ्तार पार्टी यांवर बंदी घालण्यात आली आहे.
(सौजन्य : न्यूज एक्स)
सौदीच्या इस्लामी प्रकरणाचे मंत्री शेख डॉक्टर अब्दुल लतीफ बिन अब्दुलअजीज अल-अलशेख यांच्याकडून १० सूत्री निर्देश प्रसारित करण्यात आले आहेत. यामध्ये नमाजपठण थोडक्यात आणि रात्री पूर्ण वेळेत करण्यासह मुलांना मशिदीत न आणण्याच्या निर्देशांचा समावेश आहे.
मस्जिदों में लाउडस्पीकर और इफ्तार पर पाबंदी, बच्चों के जाने पर भी रोक: सऊदी अरब में रमजान को लेकर जारी हुआ फरमान#Ramzan #Ramadan #SaudiArabia https://t.co/uU3NQseXSy
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 10, 2023
_______________________________________
संपादकीय भूमिकाभारतात कधीतरी असे होईल का ? |