सभेविषयी अपप्रचार आणि जातीय तेढ निर्माण करणार्या एस्.डी.पी.आय. विरुद्ध कायदेशीर कारवाई करा !
मंगळुरू येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस उपायुक्तांना निवेदन !
मंगळुरू (कर्नाटक) – हिंदु जनजागृती समितीने आतापर्यंत संपूर्ण भारतात २ सहस्र ३०० सभांचे नियोजन करून २५ लाख हिंदूंमध्ये धर्मजागृती केली आहे. आजपर्यंत सभेत एकही अनुचित घटना घडलेली नाही. असे असतांना इस्लामी धर्मांधाचा पक्ष असलेला सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.) त्याची राजकीय डाळ शिजावी म्हणून हिंदु आणि मुसलमान यांच्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी १२ मार्च या दिवशी होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेविषयी समाजात अपप्रचार करत आहे. या माध्यमातून ही संघटना मुसलमान समुदायाला हिंदु समाजाविरुद्ध भडकवून जातीय द्वेष निर्माण करण्याचे कुकृत्य करत आहे. अशा एस्.डी.पी.आय. विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. चंद्र मोगेर यांनी केली. या संदर्भात पोलीस उपायुक्त आशुतोष यांना निवेदन सादर केल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी उद्योगपती श्री. मधुसूदन अय्यर, श्री. दिनेश एम्.पी. आणि हिंदु महासभेचे श्री. लोकेश हे उपस्थित होते.
SDPI is linked to the banned PFI which wanted to convert India into an Islamic state. And now they are opposing the Hindu demand for Hindu Rashtra!
Hindus are not communal, SDPI is !
So #Ban_Communal_SDPI pic.twitter.com/UIVwz8juMs— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) March 10, 2023
श्री. चंद्र मोगेर पुढे म्हणाले की,
१. हिंदु जनजागृती समिती गेल्या २० वर्षांपासून कायद्याच्या चौकटीत राहून राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि समाजसाहाय्य यांचे कार्य करत आहे. हिंदु समाजात धर्माचरणाविषयी जागृती व्हावी आणि हिंदूंमध्ये एकता निर्माण व्हावी, यासाठी या सभांचे नियोजन करण्यात येते. ‘हिंदु राष्ट्र, म्हणजे हिंदु धर्म आणि राष्ट्र यांचा सन्मान करणार्यांचे राष्ट्र’, असा याचा अर्थ आहे. हे एक आध्यात्मिक, तसेच सांस्कृतिक राष्ट्र आहे.
२. आज राज्यात प्रवीण नेट्टारू यांच्यासह अनेक हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्येच्या प्रकरणात एस्.डी.पी.आय.चे कार्यकर्ते सहभागी आहेत. एवढेच नव्हे, तर बेंगळुरू केजी हळ्ळी, मंगळुरू, मैसुरू, कोडगु आणि शिवमोग्गा येथे झालेल्या दंगलींमध्येही एस्.डी.पी.आय.चे कार्यकर्ते सहभागी होते. मंगळुरू येथे एस्.डी.पी.आय.च्या कार्यक्रमात हिंदूंची हत्या करण्याचे आवाहन करणारे द्वेषपूर्ण भाषणही करण्यात आले होतेे.
३. आता याच एस्.डी.पी.आय.चे कार्यकर्ते हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांना जीव मारण्याच्या धमक्या देत आहेत. या सर्व घटना अत्यंत गंभीर असून एस्.डी.पी.आय.वर तत्परतेने कायदेशीर कारवाई करण्यात यावी.