नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाची पंतप्रधान प्रचंड यांना कारणे दाखवा नोटीस !
माओवादी हिंसाचारात ५ सहस्र लोकांच्या मृत्यूचे प्रकरण
काठमांडू (नेपाळ) – नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एक दशक चालू राहिलेल्या माओवादी हिंसाचारात ५ सहस्र लोकांच्या हत्येच्या प्रकरणात प्रचंड यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी एका याचिकेद्वारे न्यायालयात करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे. प्रचंड यांनी अशा हत्या झाल्याचे यापूर्वी स्वीकारले होते. त्यानंतर ही याचिका प्रविष्ट करण्यात आली. यावरून कारणे दाखवा नोटीस बजावतांना न्यायालयाने प्रचंड यांना ‘नेमके काय झाले होते आणि याचिकाकर्त्याच्या मागणीनुसार तुमची चौकशी का करण्यात येऊ नये ?, असे विचारले आहे. याचिकाकर्त्यांनी प्रचंड यांच्या अटकेची मागणी केली होती; मात्र न्यायालयाने ती मान्य केली नाही.
नेपाल के सुप्रीम कोर्ट ने PM प्रचंड को जारी किया कारण बताओ नोटिस, देश में पांच हजार मौतों की ली थी जिम्मेदारी #News #Dailyhunt #NepalPM https://t.co/RWZkXSaTLV
— Dailyhunt Hindi (@DH_Hindi) March 11, 2023
१५ जानेवारी २०२० या दिवशी काठमांडू येथील माघी उत्सवामध्ये प्रचंड यांनी म्हटले होते, ‘एक दशकहून अधिक काळ चाललेल्या विद्रोहाचे नेतृत्व करणार्या माओवादी पार्टीचा नेता म्हणून ५ सहस्र लोकांच्या मृत्यूचे दायित्व मी घेईन आणि उर्वरित मृत्यूंचेही दायित्व संबंधितांनी घेतले पाहिजे.’ या विद्रोहाच्या हिंसाचारात १७ सहस्र लोकांचा मृत्यू झाला होता. प्रचंड यांनी ‘पिपल्स वॉर’ या नावाखाली सशस्त्र आंदोलन केले होते.