हिंदु विद्यार्थिनीवर धर्मांतर करून विवाह करण्यासाठी मुसलमानाकडून दबाव !
उत्तरप्रदेशात ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात !
कन्नोज (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील छिब्रामाऊ कोतवाली भागात इयत्ता नववीमध्ये शिकणार्या हिंदु विद्यार्थिनीवर धर्मांतर करून विवाह करण्यासाठी तिच्याच परिसरातील एक मुसलमान तरुण दबाव टाकत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित मुलीने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. तक्रारीनंतर आरोपी तरुणाने त्याच्या कुटुंबियांसह पीडित तरुणी आणि तिचा भाऊ यांना बेदम मारहाण केली. (यातून त्यांचा उद्दामपणा दिसून येतो. कायद्याचे भय न राहिलेल्या अशांना कारागृहात टाका ! – संपादक)
‘निकाह कर नहीं तो गोली मार दूँगा’: 9वीं की हिंदू छात्रा को धमकी, पीड़िता की माँ ने CM योगी से लगाई गुहार#UP #LoveJehadhttps://t.co/Ik2zizaL6d
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 10, 2023
#कन्नौज : कक्षा नौ की छात्रा पर मुस्लिम युवक ने धर्मांतरण व निकाह करने का बनाया दवाब, शिकायत करने पर तेजाब फेंककर जान से मारने की दी धमकी देने का पीड़िता ने लगाया आरोप, परिवार ने सीएम को लिखा पत्र, कॉलेज जाते समय भी युवक करता है छेड़खानी, छिबरामऊ कोतवाली का मामला @kannaujpolice pic.twitter.com/3VL2dJO7Ew
— UttarPradesh.ORG News (@WeUttarPradesh) March 10, 2023
पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या शेजारी रहाणारा मुसलमान समुदायातील एक तरुण शाळेत जातांना तिचा रस्ता अडवून छळ करायचा. तो तिच्यावर धर्मांतर करून विवाह करण्यासाठी दबाव टाकत होता. आरोपी तरुणाने पीडित मुलीच्या घरी जाऊन, ‘विवाह न केल्यास तुला आणि तुझ्या कुटुंबियांना जिवे मारणार’, अशी धमकी दिली. या प्रकरणी अन्वेषण चालू आहे, असे पोलीस निरीक्षक संतोषकुमार कुशवाह यांनी सांगितले.