पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सदनिकांचा ताबा मिळण्यासाठी अपंगांचे पी.एम्.आर्.डी.ए.च्या कार्यालयासमोर आंदोलन !
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पी.एम्.आर्.डी.ए.च्या) पेठ क्रमांक १२ येथे ‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत पात्र अपंगांना सदनिकांचा ताबा मिळावा या मागणीसाठी ‘प्रहार अपंग क्रांती संघटने’ने ८ मार्च या दिवशी आंदोलन केले. ‘सदनिकांचा ताबा द्यावा अन्यथा कुलूप तोडून ताबा घेऊ’, अशी चेतावणी अपंगांनी दिली आहे. पी.एम्.आर्.डी.ए.चे आयुक्त राहुल महिवाल यांनी आंदोलन स्थळी येऊन अपंगांचे निवेदन स्वीकारले. ‘महाराष्ट्र फेरीवाला महासंघा’चे अध्यक्ष काशिनाथ नखाते आणि सेक्टर १२ कृती समितीने या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. पंतप्रधान आवास योजनेच्याअंतर्गत १६५ अपंगांना सदनिका मिळाल्या आहेत. अपंगांनी घराची पूर्ण रक्कम भरूनही त्यांना ताबा दिला नसल्याने सदनिका मिळण्यासाठी आंदोलन केले.
‘सदनिकांचा ताबा द्या, अन्यथा कुलूप तोडून ताबा घेऊ’; दिव्यांगाचे ‘पीएमआरडीए’च्या कार्यालयासमोर आंदोलन#Maharashtra #Pune #News #Protest https://t.co/T2IGnwzKiw
— LoksattaLive (@LoksattaLive) March 9, 2023
अपंग लाभार्थ्यांना ताबा देण्यापूर्वी सदनिकेची नोंदणी करिता स्वतंत्र तारखा उपलब्ध करून त्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. निवेदनातील मुद्यांवर सहानुभूतीपूर्वक आणि नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. या सदनिकांचा ताबा २५ एप्रिल २०२३ या दिवशी देण्याचे नियोजित आहे, असे लेखी पत्र पी.एम्.आर्.डी.ए.चे आयुक्त राहुल महिवाल यांनी अपंगांना दिले.
संपादकीय भूमिकाअसे आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून समस्या का सोडवत नाही ? |