प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर दिलेले अभिप्राय
सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या महाराष्ट्रातील भक्तांचे ८ मार्च या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले. या वेळी त्यांनी आश्रमातील अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांचे, तसेच आध्यात्मिक संशोधनाचे कार्य जाणून घेतले.
१. श्री. दिलीप भोसले (इंदूर येथील भक्तवात्सल्याश्रमाचे विश्वस्त), सांगली
अ. ‘हे सर्व अद्भुत आहे. ठिकठिकाणी असे प्रेरणादायी आश्रम स्थापन व्हावेत आणि सर्व जनतेला यातून मार्गदर्शन मिळावे अन् सर्वांची आध्यात्मिक प्रगती व्हावी.’
२. सौ. मीनाक्षी दिलीप भोसले, सांगली
अ. ‘रामनाथी आश्रम पाहून पुष्कळ छान वाटले.
आ. मला येथील स्वयंपाकघर फार आवडले, तसेच आश्रमातील व्यवस्था, टापटीपपणा आणि स्वच्छता आवडली.
इ. सर्व साधकांची लीनता पाहून मी भारावून गेले.
ई. मला येथे प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवले.’
३. श्री. दौलतराव लोंढे आणि सौ. विद्या दौलतराव लोंढे, सांगली
अ. ‘अनंत कोटी ब्रह्मांडनायक प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज), प.पू. रामजीदादा (प.पू. रामानंद महाराज) आणि प.पू. आठवलेकाका यांच्या कृपाशीर्वादाने येथे भूतलावर स्वर्गसुखाचा आनंद मिळतो. सर्व भक्त आणि इथे सेवा करणारे भक्तवृंद हसतमुखाने सेवेत रमले आहेत. ‘त्यांच्याकडून अखंड सेवा घडू दे’, हीच गुरुचरणी प्रार्थना !’
४. सौ. अचला अशोक जाधव, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग.
अ. ‘रामनाथी आश्रम पाहून आनंदीआनंद वाटला. येथे पुष्कळच वेगळेपणा वाटला.’
५. श्री. भालचंद्र गणेश दीक्षित, नाशिक
अ. ‘आश्रमात सेवा करणार्या साधकांच्या नामजपाचा प्रभाव प्रकर्षाने जाणवला.
आ. आश्रमातील स्वच्छता आणि सर्व प्रकारचे नियोजन वाखाणण्याजोगे अन् अनुकरणीय आहे.
इ. ‘आश्रमातील साधकांप्रमाणे सेवाभाव आपल्यात (स्वतःत) कसा आणता येईल ?’, असा विचार माझ्या मनात आला.’
६. सौ. शुभांगी भालचंद्र दीक्षित, नाशिक
अ. ‘प.पू. भक्तराज महाराज यांचे पूर्ण आशीर्वाद, कृपा आणि पूज्य डॉक्टरकाकांसारखे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे) एकनिष्ठ आणि सेवाभावी शिष्य कसे असतात ?’, हे हा आश्रम बघून कळाले.’
७. श्री. गिरीष गणेश दीक्षित (इंदूर येथील भक्तवात्सल्याश्रमाचे विश्वस्त आणि कोषाध्यक्ष), नाशिक
अ. ‘आश्रम पहात असतांना मला प.पू. भक्तराज महाराज यांचे सतत स्मरण होत होते.
आ. ‘आश्रमात पुष्कळ ऊर्जा आहे आणि आपल्यालाही ती प्राप्त होत आहे’, असे मला जाणवले.
इ. आश्रमात असतांना मनामध्ये वाईट विचार येत नाहीत आणि मनात वाईट विचार असतील, तर ते निघून जातात.
ई. आश्रमाचा विस्तार पाहून ‘ईश्वरी शक्ती आपल्यावर प्रसन्न आहे’, हे जाणवते.’
८. सौ. जया गिरीश दीक्षित, नाशिक
अ. ‘आश्रम पाहून मला अतिशय अभिमान आणि आनंद वाटला. डॉक्टरकाका किती ध्यास आणि कष्ट घेऊन बारकाव्यांनी हे सर्व जे करत आहेत, त्या कष्टाला तोड नाही.
आ. प.पू. बाबांच्या (प.पू. भक्तराज महाराज यांच्या) कृपेविना हे शक्य नसल्याने त्यांच्या कृपेचा अनुभव घेतला.’
(सर्व अभिप्रायांचा दिनांक : ८.३.२०२३)
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून दिलेले अभिप्राय
१. श्री. भालचंद्र गणेश दीक्षित, नाशिक
अ. ‘हे प्रदर्शन बघितल्यामुळे ‘सत्कार्य करणार्या साधकांना परमेश्वर कसे साहाय्य करतो आणि अनिष्ट शक्तींचा प्रभाव किती तीव्र असतो ?’, हे शिकायला मिळाले.’
२. श्री. गिरीष गणेश दीक्षित, नाशिक
अ. ‘ज्यांचा सूक्ष्म जगतावर विश्वास नाही, त्यांचाही हे प्रदर्शन पाहून त्यावर विश्वास बसेल.
आ. हे प्रदर्शन पाहून ‘सूक्ष्म शक्ती वास करतात. त्या वाईट किंवा चांगल्या दोन्ही आहेत’, हे आपल्याला समजते.’
३. सौ. जया गिरीश दीक्षित, नाशिक
अ. ‘प्रदर्शन पाहिल्यावर मला सूक्ष्म जगताविषयीच्या अभ्यासाची ओढ वाटू लागली.’
(सर्व अभिप्रायांचा दिनांक : ८.३.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |