सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या मुख्यालयात ‘महिलादिन’ उत्साहात साजरा !
सांगली, १० मार्च (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात जागतिक महिलादिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
सौजन्य सी न्यूज
या वेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपायुक्त स्मृती पाटील, महिला आणि बालकल्याण सभापती अस्मिता सलगर, समाजकल्याण सभापती अनिता व्हनखंडे, माजी सभापती गीतांजली ढोपे-पाटील, नगरसेविका लक्ष्मी सरगर, नगरसेविका अनारकली कुरणे, उर्मिला बेलवलकर, अप्सरा वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. महापालिकेचे नगरसचिव चंद्रकांत आडके, साहाय्यक आयुक्त अशोक कुंभार, उज्ज्वला शिंदे यांच्यासह महापालिकेचे महिला अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.