सर्व कक्षांमध्ये सनातनचा कक्ष वैशिष्ट्यपूर्ण ! – सौ. शुभांगी बिरमुळे, सरपंच, रेठरेहरणाक्ष
महिलादिनाच्या निमित्ताने रेठरेहरणाक्ष येथील कार्यक्रमात सनातनचा प्रदर्शन कक्ष
रेठरेहरणाक्ष (जिल्हा सांगली) – येथे महिलादिनाच्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी २६ वेगवेगळ्या प्रकारचे कक्ष लावण्यात आले होते. यातील एक कक्ष सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा लावण्यात आला होता. या कक्षाच्या सेवेत धर्मप्रेमी सौ. समिधा खोत याही सहभागी झाल्या होत्या. या प्रदर्शनास रेठरेहरणाक्ष येथील सरपंच सौ. शुभांगी बिरमुळे यांनी भेट दिली आणि कक्षावर असणार्या सनातनच्या साधिका सौ. सुरेखा पाटील, तसेच धर्मप्रेमी सौ. समिधा खोत यांचा गुच्छ देऊन सत्कार केला. ‘या सर्व कक्षांमध्ये तुमचा कक्ष वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्यासाठी तुम्ही लांबून येऊन नियोजन केले, हे विशेष कौतुकास्पद आहे’, असे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले.