(म्हणे) ‘महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी भयमुक्त पोषक वातावरण निर्मितीची आवश्यकता !’ – ‘उपराकार’ लक्ष्मण माने
सातारा, १० मार्च (वार्ता.) – कुटुंबातील स्त्री शिकली, तर तिच्या सर्व पिढ्या पुढे जातात. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवत आहेत. शिक्षण आणि नोकरीच्या समान संधी शोधत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील महिला स्वत:च्या अस्तित्वाविषयी जागृत होत आहेत. अशा वेळी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भयमुक्त पोषक वातावरण निर्माण करण्याचे उत्तरदायित्व आपले आहे, असे प्रतिपादन भारतीय भटके विमुक्त विकास आणि संशोधन संस्थेचे कार्याध्यक्ष ‘उपराकार – लक्ष्मण माने यांनी केले. आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.