भाजपचे खासदार मुनीस्वामी यांनी पती जिवंत असतांना टिकली न लावणार्या महिलेला खडसावले !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकच्या कोलार मतदारसंघातील भाजपचे खासदार एम्. मुनीस्वामी यांनी चन्नइहा मंदिराच्या एका प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर एका विक्री केंद्रावरील कपड्यांची विक्री करणार्या महिलेला तिने पती जिवंत असतांना टिकली न लावल्याने खडसावले.
Karnataka: बिंदी न लगाने पर BJP सांसद ने महिला को बुरी तरह से डांटा, वायरल वीडियो पर खड़ा हुआ विवाद#Karnataka #BJP #BindiControversy
#SMuniswamyhttps://t.co/xFMfSAi1ih— Amar Ujala (@AmarUjalaNews) March 9, 2023
मुनीस्वामी या महिलेला म्हणाले, ‘‘प्रथम कपाळावर टिकली लाव. तुझा नवरा जिवंत आहे ना ? तुला ‘कॉमन सेन्स’ (सामान्य ज्ञान) नाही का ?’’ असे सांगून मुनीस्वामी यांनी या महिलेला टिकली देण्यास त्यांच्या सहकार्यांना सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर वाद निर्माण झाला. काँग्रेसने या घटनेचा निषेध केला आहे. ‘अशा घटनांवरून भाजपची संस्कृती दिसून येते’, अशी टीकाही काँग्रेसने केली. (काँग्रेसच्या या टीकेतून त्यांची विकृती दिसून येते, असे कुणी म्हटल्यास ते चुकीचे नाही ! – संपादक)
काँग्रेसने या घटनेचा केला निषेध !
(सौजन्य : India Today)
संपादकीय भूमिका
|