निवृत्त अग्नीवीर सैनिकांना सीमा सुरक्षा दलामध्ये १० टक्के आरक्षण मिळणार !
नवी देहली – भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी गेल्या वर्षी संरक्षण मंत्रालयाने चालू केलेल्या अग्नीवीर योजनेतील सैनिक निवृत्त झाल्यावर त्यांना सीमा सुरक्षा दलामध्ये १० टक्के आरक्षण देण्यात येणार आहे.
अग्निवीरों के लिए गृह मंत्रालय ने की बड़ी घोषणा
(@aajtakjitendra)https://t.co/1M48uQNTKg— AajTak (@aajtak) March 10, 2023
केंद्रशासनाने ही घोषणा केली आहे. तसेच कमाल वयोमर्यादेतही सूट देण्यात आली आहे. या लोकांना शारीरिक चाचणीही द्यावी लागणार नाही. यापूर्वी केंद्रशासनाने आसाम रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांमध्येही अग्नीविरांसाठी आरक्षण घोषित केले आहे.