रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !
१. सौ. पुष्पा चांदवडकर, नवी मुंबई
१ अ. आश्रम स्वर्गाप्रमाणे आहे ! : ‘सनातनच्या आश्रमाला दिलेली भेट आनंददायी होती. आश्रमातील नीटनेटकेपणा, स्वच्छता आणि येथे चालू असलेली सेवा पाहून मी भारावून गेले. आश्रम स्वर्गाप्रमाणे आहे. मला माझे दुसरे घर मिळाले.’ (८.५.२०२२)
२. श्री. राजेश नगर, नवी देहली
अ. ‘मला आश्रमातील प्रत्येक साधकाभोवती सकारात्मक आभा आणि सकारात्मक स्पंदने जाणवली.
आ. नामजप न करताही येथे सहजपणे चैतन्य जाणवते.
इ. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे : ‘मला सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन प्रत्यक्ष पहाता आले आणि त्यातून पुष्कळ शिकता आले. मी शोधत असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला या ठिकाणी मिळाली.’ (६.११.२०२२)
|