वडगाव मावळ (पुणे) येथील अवैध दारूचा अड्डा महिलांनी केला उद्ध्वस्त !
पुणे – वडगाव मावळ येथील रेल्वेस्थानकाच्या भागात चालणारा अवैध हातभट्टी दारूचा अड्डा ‘मोरया महिला प्रतिष्ठान’च्या रणरागिनींनी एकत्र येऊन उद्ध्वस्त केला. या दारूच्या अड्ड्यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला यांना दारू पिणार्यांचा त्रास होत होता. याविषयी पोलिसांना निवेदन दिले की, तात्पुरत्या स्वरूपात काही काळ अड्डा बंद रहायचा. काही काळाने पुन्हा चालू होत होता. अखेर महिलांनी संघटित होऊन अड्डाच उद्ध्वस्त केला. ८ मार्च या ‘महिलादिनी’ महिलांनी केलेल्या कृतीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.