दापोली (रत्नागिरी) : ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना महावितरण उपकार्यकारी अभियंता विंचूरकर याला पकडले !
दापोलीत लाचलुचपत विभागाची कारवाई !
रत्नागिरी, ९ मार्च (वार्ता.) – दापोली येथील महावितरण उपकार्यकारी अभियंता अमोल मनोहर विंचूरकर याला ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दुपारी १.४७ वाजता पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार,
दापोली महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता अमोल मनोहर विंचूरकर यांनी तक्रारदार (वीज ठेकेदार) यांना त्यांचे पक्षकाराकडे बसवण्यात येणार्या ११० केव्हिए वीजभार आणि वीजरोहित्र या कामाच्या अंदाजे किमतीला (एस्टिमेटला) संमती देवून तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यासाठी ८० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. त्यातील ५० सहस्र रुपयांची लाच घेत असतांना अभियंता विंचूरकर यांना पकडले.
लाचलुचपत विभागाकडून पुढील कारवाई चालू असून ही कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री. सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनंत कांबळे आणि पथकातील अन्य पोलीस कर्मचार्यांनी केली.
संपादकीय भूमिकाअशा लाचखोरांसमवेत त्यांच्या कुटुंबियांचीही संपत्ती जप्त केली, तरच अशा प्रकारांना थोडा तरी आळा बसेल ! |