प्राध्यापकांनी नक्कल (कॉपी) करण्यासाठी ६ विद्यार्थ्यांकडून घेतले प्रत्येकी ५०० रुपये !
गडचिरोली येथे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचा प्रकार !
गडचिरोली – जिल्ह्यातील कुरखेडा येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रप्रमुख असलेल्या प्राध्यापकांनी इयत्ता १२ वीच्या परीक्षेत नक्कल (कॉपी) करू देण्यासाठी ६ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये घेतले. यातील एका विद्यार्थ्याने प्राध्यापकाला पैसे देतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला. त्यातून हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरून आरोपी प्राध्यापक किशोर कोल्हे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर प्राध्यापक कोल्हे यांनी सदर विद्यार्थ्याला व्हिडिओ पुसून टाकण्यास (डिलीट करण्यास) सांगितले.
संपादकीय भूमिकाविद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारे नव्हे, तर बिघडवणारे असे प्राध्यापक काय कामाचे ? |