पाकमधील महिलांच्या अधिकाराच्या उल्लंघनाच्या विरोधात नेदरलँड्समध्ये मोर्चा
अॅम्स्टरडॅम्स (नेदरलँड्स) – पाकिस्तानमध्ये महिला आणि तरुणी यांच्या होणार्या मानवाधिकाराच्या हननाच्या विरोधात पाकिस्तानी नागरिकांनी येथे मोर्चा काढला होता. यात ‘अॅक्शन कमेटी फॉर क्रिश्चियन राइट्स’, ‘ओव्हरसीज पाकिस्तान क्रिश्चियन अलायन्स’ आणि ‘ग्लोबल ह्यूमन राइट्स डिफेंस’ या संघटनांनी सहभाग घेतला.
या संघटनांनी म्हटले की, पाकिस्तानात महिलांवर बलात्कार, हत्या, कौटुंबिक हिंसा, बलपूर्वक विवाह, धर्मांतर आदी गोष्टी सामान्य आहेत. धर्मांतर आणि बलपूर्वक विवाह यांच्या संदर्भातील घटना अल्पसंख्यांकांविषयी अधिक होते. पाकमध्ये हिंदु आणि ख्रिस्ती यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यांचे अपहरण करून धर्मांतर आणि विवाह लावून दिले जाते. या तरुणींचे पालक न्यायालयीन लाढाईतही अपयशी ठरतात.