श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणातील मुख्य पक्षकार आशुतोष पांडे यांना मुसलमानाकडून धमकी !
मथुरा – श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टला पुन्हा धमक्या मिळाल्याचे प्रकरण समोर आले आहे. श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणातील मुख्य पक्षकार आशुतोष पांडे यांनी, ‘एका मुसलमान तरुणाने श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या इदगाह मशिदीच्या प्रकरणात तुम्ही ट्रस्टच्या बाजूने लढू नये. यातून माघार न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी दिली आहे’, अशी माहिती दिली. आशुतोष पांडे यांना यापूर्वीही अशा धमक्या मिळाल्या होत्या. याविषयी त्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. श्रीकृष्णजन्मभूमीवर मुसलमान आक्रमकांनी इदगाह मशीद बांधली होती. ही पवित्र भूमी परत मिळावी, यासाठी हिंदू न्यायालयीन लढा देत आहेत.
श्रीकृष्ण जन्मभूमि विवाद में पैरवी मत करो वरना…मुख्य वादी आशुतोष पांडेय ने फिर लगाया धमकी मिलने का आरोप https://t.co/hBlYzauAeL via @NavbharatTimes
— Ashutosh Pandey {श्री कृष्ण जन्मभूमि} (@AshutoshBhriguV) March 9, 2023
गेल्या वर्षी या प्रकरणातील मुख्य पक्षकार महेंद्र प्रताप यांनाही धमकी देण्यात आली होती. त्यांनी वृंदावन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करून सुरक्षेची मागणी केली होती. महेंद्र प्रताप यांनी आगरा येथील जामा मशिदीचे अध्यक्ष जाहिद कुरेशी यांच्यावर जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता.
संपादकीय भूमिकाधार्मिक स्थळे परत मिळण्यासाठी न्यायालयीन लढा देणार्या हिंदूंना धमकावणार्यांना न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, असे समजायचे का ? |