अवकाळी पावसामुळे झालेल्या हानी भरपाईसाठी विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग !
मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – अवकाळी पावसामुळे झालेल्या राज्यातील पिकांच्या हानीसाठीसाठी भरपाईची घोषणा करावी, कांद्यांची खरेदी करावी, या मागण्यांसाठी विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचनामे चालू असल्याची माहिती सभागृहात दिली. या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभापतीच्या आसनामुळे येऊन घोषणा दिल्या. त्यानंतर सभात्याग केला.
या वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे राज्यातील १ लाख एकर क्षेत्र बाधित झाले आहे.
मुख्यमंत्र्यांनी हानीची ठिकाणे सांगितली, त्यामध्ये कोकण आणि विदर्भ येथील काही ठिकाणांचा समावेश नाही. सरकारकडून अद्यापही कांद्याची खरेदी चालू करण्यात आलेली नाही, अशी माहिती सभागृहात दिली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या हानीचे पंचनामे युद्धपातळीवर करावेत, यासाठी जिल्हाधिकार्यांना सूचना देण्यात आली आहे. शेतकर्यांना साहाय्य करण्याची सभागृहाची भावना आहे. सरकार शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही. राज्यात काही ठिकाणी नाफेडकडून कांद्याची खरेदी चालू आहे. कांदा उत्पादकांनाही सरकार न्याय देईल, असे सभागृहाला आश्वासित केले.