रंग खेळल्यानंतर हात-पाय धुण्यास गेलेल्या विद्यार्थ्याचा नदीमध्ये बुडून मृत्यू !
पुणे – रंग खेळून इंद्रायणी नदीमध्ये हात-पाय धुवायला गेलेला अभियांत्रिकीचा विद्यार्थी जयदीप पाटील याचा पाय घसरून नदीत बुडून मृत्यू झाला आहे. तो जळगावचा रहिवासी आहे. आंबी येथील डॉ. डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थी धूलिवंदन खेळले. हे सर्वजण वराळे परिसरातील इंद्रायणी नदीपात्रात हात-पाय धुण्यास गेले होते. तेव्हा ही दुर्घटना घडली. या प्रकरणी तळेगाव पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.