महिलांवरील अत्याचारावर शून्य सहिष्णुतेचे धोरण अवलंबावे ! – भारताचे आवाहन
न्यूयॉर्क – आज जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. त्याच वेळी भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला जोर देऊन सांगितले आहे की, आतंकवाद्यांकडून महिला आणि मुली यांच्यावर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार चालू आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांनी महिलांवरील अत्याचारावर शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबावे, असे आवाहन भारताने केले आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी नुकतेच सांगितले की, सदस्य राष्ट्रांनी राजकीय प्रक्रिया आणि निर्णय प्रक्रिया यांमध्ये महिलांच्या सहभागासाठी आणि समावेशासाठी अनुकूल वातावरण प्रदान केले पाहिजे.
End violence against women & girls by terrorists, India calls for zero-tolerance approach@ruchirakamboj @IndiaUNNewYork
Read more: https://t.co/DaBoRg9yyx
— Prasar Bharati News Services & Digital Platform (@PBNS_India) March 8, 2023
कंबोज म्हणाल्या की, आतंकवाद्यांकडून महिला आणि मुली यांच्यावर अत्याचार चालूच आहेत. याचा सर्व देशांनी तीव्र निषेध केला पाहिजे. तसेच त्यांनी सर्व प्रकारच्या आतंकवादाविषयी शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारले पाहिजे.