श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन !
पलूस (जिल्हा सांगली) – छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १० मार्च या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर श्री समर्थ धोंडीराज महाराज गाठीमठ, शिवतीर्थ या ठिकाणी होईल. तरी अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पलूस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.