परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान कोण देते ?’, याविषयी केलेले मार्गदर्शन आणि त्याविषयी झालेली विचारप्रक्रिया !
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘वर्ष २०२२ मध्ये एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले हे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना ( कु. मधुरा भोसले, श्री. निषाद देशमुख आणि श्री. राम होनप) यांना म्हणाले, ‘‘ज्ञानाची देवता सरस्वतीदेवी आहे. विविध विषयांवरील सूक्ष्म ज्ञान ती तुम्हाला देते.’’ हे ऐकल्यावर मला आठवले की, आदल्या दिवशीच माझ्या मनात विचार आला होता, ‘मला सूक्ष्मातून ज्ञान सरस्वतीदेवीकडून मिळते.’ हा विचार देवाचाच होता, हे माझ्या लक्षात आले. अध्यात्मातील विविध विषयांवर सूक्ष्म ज्ञान मिळवण्याची सेवा देवाच्या कृपेमुळे माझ्याकडून अनेक वर्षांपासून होत होती; परंतु ‘हे ज्ञान मला कुणाकडून मिळते ?’, याचे ‘ज्ञान’ गुरूंनी मला करून दिले. यावरून जीवनात गुरूंचे महत्त्व लक्षात येते.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.२.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. |