इस्लामिक स्टेटने घेतले कोइम्बतूर (तमिळनाडू) येथील बाँबस्फोटाचे दायित्व !
हिंदूंवर सूड उगवण्यासाठी आक्रमणे करत रहाण्याची धमकी
कोइम्बतूर (तमिळनाडू) – येथे काही मासांपूर्वी मंदिराजवळ चारचाकी गाडीमध्ये झालेल्या बाँबस्फोटाचे दायित्व ‘द इस्लामिक स्टेट खोरासन प्रोविंस’ या जिहादी आतंकवादी संघटनेने घेतले आहे. ‘हिंदूंवर सूड उगवण्यासांठी, तसेच भारतात रक्तापात करण्यासाठी आणखी आक्रमणे केली जातील’, अशी या संघटनेने धमकी दिली आहे. यावर भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी म्हटले, ‘इस्लामिक स्टेटने कोइम्बतूरमधील स्फोटाचे दायित्व घेतले आहे. आशा आहे की, द्रमुकवाले (द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) कमीत कमी झोपेतून तरी जागे होतील आणि ‘सिलिंडरमध्ये स्फोट झाला होता’, हा दावा करणे बंद करतील.’
‘हिन्दुओं से बदला लेंगे, भारत में बहेगा खून और होंगे हमले’: ISIS ने ली कोयम्बटूर मंदिर धमाके की जिम्मेदारी, BJP ने पूछा – अब भी इसे सिलेंडर ब्लास्ट बताएगी DMK?#CoimbatoreBlast #ISKP #ISIS #TamilNaduhttps://t.co/S854fQWK1S
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 7, 2023
या स्फोटाचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून केले जात आहे. २३ ऑक्टोबर २०२२ या दिवशी हा स्फोट झाला होता. यात मुबिन नावाचा तरुण ठार झाला होता. तो हा बाँब मंदिराजवळ ठेवणार होता.
The Islamic State in Khorasan Province, a terrorist organisation, has claimed responsibility for the Coimbatore Suicide Bombing incident.
Hope @arivalayam party members wake up at least now and give up their “Cylinder Blast” theory.
— K.Annamalai (@annamalai_k) March 7, 2023
संपादकीय भूमिकाहिंदूंवर जिहादी आतंकवाद्यांनी सहस्रो आक्रमणे केली; मात्र हिंदूंनी कधी त्यांचा सूड घेतला नाही. उलट ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असेच पुरो(अधो)गामी हिंदू सांगत राहिले, हे लक्षात घ्या ! |