दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्या पाकिस्तानचे पंतप्रधान रमझान मासात गव्हाचे पीठ विनामूल्य वाटणार !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी रमझानच्या मासामध्ये गरीबांना गव्हाचे पीठ विनामूल्य वाटण्याची घोषणा केली. सध्या पाकध्ये गव्हाच्या पिठाची प्रचंड कमतरता निर्माण झालेली आहे. येत्या २४ मार्चपासून रमझान मास चालू होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पंजाब प्रांतात पीठ वाटण्यात येणार आहे.