वाहनावर पाण्याचा फुगा फेकल्याने व्यक्तीने मुलांना दिली ठार मारण्याची धमकी
फरीदाबाद (हरियाणा) – येथील एन्.आय.टी. बी ब्लॉक भागामध्ये होळी खेळतांना मुलांनी एका चारचाकी गाडीवर पाण्याचे फुगे फेकले. याचा राग आल्याने गाडीमधील व्यक्तीने पिस्तुलाचा धाक दाखूव मुलांना ठार मारण्याची धमकी दिली.
#Holi: होली खेल रहे बच्चों ने कार पर फेंका गुब्बारा तो शख्स ने हाथों में गन लेकर दौड़ाया@FBDPolice#Holi2023 #holicelebration #Faridabad #policecase #latestnews #HoliFestival #cctv #moneycontrolhttps://t.co/XMnE5LUojL
— Moneycontrol Hindi (@MoneycontrolH) March 7, 2023
ही व्यक्ती पाठलाग करत त्यांच्या घरापर्यंत पोचली. तिने शिवीगाळ केली. या घटनेमुळे मुले घाबरली होती. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली. पोलिसांनी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.