कराची विश्वविद्यालयातही होळी खेळणार्या हिंदु विद्यार्थ्यांवर आक्रमण : काही विद्यार्थी घायाळ
कराची (पाकिस्तान) – लाहोर येथील पंजाब विश्वविद्यालयात होळी खेळणार्या हिंदु विद्यार्थ्यांवर आक्रमण करण्यात आल्याच्या घटनेप्रमाणेच घटना कराची विश्वविद्यालयातही घडली. येथे मुसलमान विद्यार्थ्यांनी केलेल्या आक्रमणात काही हिंदु विद्यार्थी घायाळ झाले. या घटनेला विश्वविद्यालयाच्या अधिकार्यांनी दुजोरा दिला.
Holi festival in Pakistan
1) 15 Hindu students injured after being attacked by Islami Jamiat-e-Talaba (IJT) radicals for celebrating Holi at Punjab University, Lahore
2) Hindu students beaten up by Islami Jamiat-e-Talaba (IJT) radicals for celebrating Holi at Karachi University pic.twitter.com/mYmGvDmchD
— Anshul Saxena (@AskAnshul) March 7, 2023
विश्वविद्यालयातील सिंधी विभागामध्ये हिंदु विद्यार्थी होळी खेळत असतांना त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले. अधिकार्यांनी सांगितले की, अशी घटना आमच्या धोरणाच्या विरोधात आहे. आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत.
एका हिंदु विद्यार्थिनीने या घटनेचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यात तिने म्हटले आहे की, इस्लामी जमियत तुलबा (आयजेटी) संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी आमच्यावर आक्रमण केले.
संपादकीय भूमिकाइस्लामी देशातील मुसलमानांचा ‘सर्वधर्मसमभाव’ ! याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! |