महाराष्ट्रातील देवस्थानच्या भूमी हडप करणारी यंत्रणा कार्यरत
गृहमंत्र्यांकडून चौकशीचा आदेश !
मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – देवस्थानच्या भूमी विकण्याचे मोठे ‘रॅकेट’ राज्यात कार्यरत असून याची व्याप्ती मोठी आहे. काही सरकारी अधिकार्यांनीच देवस्थानच्या भूमी हस्तांतरित करण्याचे आदेश दिले असल्याचे प्राथमिक अन्वेषणात आढळून आले आहे. भ्रष्टाचार निर्मूलन पथकाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत दिली. देवस्थानच्या भूमी पुन्हा मिळाव्यात, तसेच भविष्यात पुढे असे प्रकार होऊ नयेत, यासाठी शासन कायदा करण्याच्या विचारात असल्याचीही या वेळी गृहमंत्र्यांनी दिली.
हिंदू देवस्थान जमिनींवर कुणी कब्जा केला असेल किंवा कुणी त्या विकल्या असतील तर त्याची गय केली जाणार नाही.
13 डिसेंबर 2021 रोजी मी स्वतः विरोधी पक्षनेता असताना पत्र लिहिले होते.
बीड जिल्ह्यातील या प्रकाराचा किमान 4 महिन्यात तपास करण्यास सांगण्यात येईल.
(विधानसभा । दि. 8 मार्च 2023) pic.twitter.com/YMAXfbwsfX— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 8, 2023
१. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हिंदूंच्या देवस्थानच्या भूमी हडप करण्यात आल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील आष्टी येथे अनेक हिंदू देवस्थानांच्या ट्रस्टच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार घडला आहे. आज प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहाचे लक्ष या गंभीर मुद्द्याकडे वेधले. हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार कोणीही खपवून घेऊ शकत नाही. #BudgetSession2023 pic.twitter.com/ld4bb5FntF
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 8, 2023
२. या प्रकरणात खोटे गुन्हे नोंदवून तक्रारदाराचे मनोधैर्य खच्चीकरण करण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या गंभीर प्रकरणाचे अन्वेषण समयमर्यादेत पूर्ण करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
३. बीड येथील आमदार प्रकाश सोळंके यांनी बीड जिल्ह्यातील ९४ देवस्थानच्या जमिनी हडप करण्यात आल्याची शंका व्यक्त केली.
४. आमदार रईस शेख यांनी वक्फ मंडळाची भूमीही बळकावण्यात आल्याची माहिती सभागृहात दिली. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हा घोटाळा मोठा आहे. यामध्ये अनेक मोठे लोक सहभागी असल्याची माहिती सभागृहात दिली.
DCM Shri Devendra Fadnavis Se Waqf Land Ke Masle Par Sawal Jawab pic.twitter.com/sb5UxOu83E
— Rais Shaikh (@rais_shk) March 8, 2023
५. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी देवस्थानच्या बक्षीस देण्यात आलेल्या भूमी विकल्या गेल्या आहेत. त्यांवर घरपट्टीही लागली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बाळासाहेब थोरात महसूलमंत्री असतांना त्यांनी कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. अशा प्रकारचा कायदा सरकार करणार का ? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर फडणवीस यांनी सरकार कायदा आणण्याच्या विचारात असल्याचे म्हटले.
देवस्थानाच्या ज्या जागा इनामी दिल्या गेल्या त्यातील काही जागा या विकल्या गेल्या, त्याचे खरेदी खत झाले, घरांना घरपट्टी आकारली जाते. मात्र या जमिनी नावावर होत नाहीत. १/२@Dev_Fadnavis @bb_thorat @bjp4mumbai @bjp4maharashtra #mahabudget #budgetsession2023 pic.twitter.com/T20raPECmM
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 8, 2023
अन्य जिल्ह्यांतूनही देवस्थानच्या भूमी हडप करण्याचे प्रकार पुढे येत आहेत !
हिंदू देवस्थानच्या भूमी अवैध्यरित्या विकल्या गेल्या असतील, तर त्यावर कारवाई करण्याचे दायित्व सरकारचे आहे. महाविकास आघाडीचे सरकार असतांना १२ डिसेंबर २०२१ या दिवशी मी बीडच्या पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून देवस्थानच्या भूमी हडप करण्यात आल्याची माहिती दिली आहे. बीडसह अन्य जिल्ह्यांतूनही अशी प्रकरणे पुढे येत असून या प्रकरणाचे अन्वेषण सरकार गांभीर्याने करेल, असे गृहमंत्री फडणवीस यांनी म्हटले.