सनातन संस्थेच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळणार्या सूक्ष्म ज्ञानात परात्पर गुरु डॉ. आठवले अनेक उपप्रश्न विचारतात त्यामागील कारणे !
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले सनातन संस्थेच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना (कु. मधुरा भोसले, श्री. निषाद देशमुख आणि श्री. राम होनप यांना) अध्यात्मातील विविध विषयांवर आधारित प्रश्नांची संगणकीय धारिका देतात. ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळणार्या उत्तरांतून नवीन विषयातील अध्यात्मशास्त्राचा उलगडा होतो. ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना एखाद्या विषयाचे सूक्ष्मातून ज्ञान मिळाल्यावर ही धारिका परात्पर गुरु डॉक्टर पडताळतात. ‘या धारिकेतील विषय परिपूर्ण व्हावा’, यासाठी परात्पर गुरु डॉक्टर ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना त्या धारिकेत त्या विषयाला अनुसरून आणखी अनेक उपप्रश्न विचारतात. उपप्रश्नांची संख्या कधी ५ असते, कधी १० असते, तर कधी ३० ते ३५ इतकी असते.
परात्पर गुरु डॉक्टरांनी विचारलेल्या उपप्रश्नांची उत्तरे ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्म ज्ञानाद्वारे प्राप्त होतात. ही उत्तरे परत परात्पर गुरु डॉक्टर पडताळतात. त्यानंतर एका विषयाची धारिका पूर्ण होते. ‘परात्पर गुरु डॉक्टर एकेक विषय पूर्ण होण्यासाठी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना इतके उपप्रश्न का विचारतात ? त्यासाठी इतका वेळ का देतात ?’, यांची उत्तरे पुढे दिली आहेत.
१. ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान वाचतांना वाचकांच्या मनात कुठलीही शंका राहू नये, तसेच तो विषय सुस्पष्ट व्हावा.
२. ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांची ‘ज्ञान मिळवणे’, ही त्यांची साधना आहे. परिपूर्ण उत्तरांमुळे ही साधना योग्य प्रकारे होणार आहे.
३. सेवा परिपूर्ण करण्याचा संस्कार ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांवर व्हावा.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.२.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. |