बेळगाव-धारवाड या मार्गावरील अनारक्षित एक्स्प्रेसचा प्रारंभ !
बेळगाव – बेळगाव-धारवाड या मार्गावरील अनारक्षित एक्स्प्रेसचा प्रारंभ ६ मार्चपासून खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते करण्यात आला. या रेल्वेमुळे सायंकाळच्या वेळी बेळगावहून धारवाड, तसेच तेथून म्हैसूरला जाणे सोयीचे ठरणार आहे. २२ डबे असलेली (वातानुकूलित डब्यांची सुविधा असलेली) ही गाडी प्रतिदिन बेळगाव येथून रात्री ७.३० वाजता निघेल आणि रात्री ९.५५ वाजता धारवाड येथे पोचेल, तसेच धारवाड येथून सकाळी ८.१५ ला निघेल आणि सकाळी १०.४५ वाजता बेळगाव येथे पोचेल.