पूर्वीची आणि आताची भारतीय स्त्री यांच्यातील भेद
भारतीय स्त्रीचा तो संकोच, ते लाजणे, ते पुनःपुन्हा पदर सावरणे, ते मंद मधुर-स्मित ! लज्जा हेच भारतीय स्त्रीचे भूषण. भारतीय नारी आणि युरोपियन स्त्री या दोघींमध्ये दोन ध्रुवांइतके अंतर आहे, नव्हे विरोध आहे.
विश्वविख्यात मानसशास्त्रज्ञ ‘जुंग’ भारतात येऊन गेला. त्याला विचारले, ‘‘मनाला खेचून घेणारे, चित्त खिळवून टाकणारे असे काही विशेष तुम्हाला भारतात दिसले का ?’’ तो उत्तरतो, ‘‘हिंदु नारीचा संकोच. तिची सलज्जता. त्या आपला पदर सावरतात, ती गोष्ट अपूर्व आणि विलक्षण मुग्ध अन् मोहित करणारी आहे.’’
पत्रकारांनी त्यांना दुसरा प्रश्न विचारला, ‘‘या संदर्भात युरोपियन स्त्रियांसंबधी तुम्हाला काय सांगायचे आहे ?’’ जुंग सांगतो, ‘‘युरोपियन स्त्रिया पँट घालून डेकवर (जहाजावर) हिंडतांना पाहिले की, ओकारी येते.
हिंदु स्त्रिया पाश्चात्त्य स्त्रीप्रमाणे लज्जेचे (blushing) प्रदर्शन करत नाहीत; परंतु त्या जे विनयपूर्वक स्मित करतात, त्यात असलेला मधुरपणा, शुचिता आणि मायाळूपणा यांची तोड कशालाही येणार नाही.’’ गुरुदेवांची वाणी गदगदली होती. खंत व्यक्त करतांना गुरुदेव म्हणाले, ‘‘पण आज हे सगळे अस्तंगत होत आहे.’’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑगस्ट २०११)