तलवारबाजी स्पर्धेत सनातनचा बालसाधक कु. श्रीरंग दळवी याला कांस्यपदक !
पणजी – येथे ‘गोवा फेन्सिंग असोसिएशन’च्या वतीने २५ आणि २६ फेब्रुवारी असे २ दिवस ‘अखिल गोवा राज्य फेन्सिंग (तलवारबाजी) चॅम्पियनशिप स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. १२ वर्षांखालील स्पर्धेत मुलांच्या गटामध्ये पर्वरी येथील एल्. डी. सामंत मेमोरियल विद्यालयातून सनातनचा बालसाधक कु. श्रीरंग दळवी (वय ९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) याने कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेसाठी कु. श्रीरंग याला प्रशिक्षक श्री. अरुण सैनी यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेच्या यशाविषयी कु. श्रीरंग म्हणाला, ‘‘या स्पर्धेत प्रत्येक फेरीच्या वेळी प्रहार करतांना मी ‘हर हर महादेव’ असा जयघोष केल्यामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण होत होता. त्या वेळी माझ्या मनात शिवाचा जप चालू होता.’’ कु. श्रीरंगने या यशाचे सर्व श्रेय सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण केले आहे.