‘एच्३एन्२’ फ्लूपासून सतर्कतेची चेतावणी
नवी देहली – कोरोनाच्या प्राणघातक संसर्गानंतर आता देशभरात ‘एच्३एन्२’ फ्लूच्या नवीन रुग्णांची नोंद होत आहे. ‘एच्३एन्२ ’ इन्फ्लूएझा व्हायरस नावाच्या फ्लूचा संसर्ग झालेल्या रुग्णामध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे ही लक्षणे दिसून येतात, असे ‘एम्स’चे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.
‘एच्३एन्२ ’ फ्लू गेल्या दोन-तीन मासांपासून मोठ्या प्रमाणावर लोकांच्या आरोग्यासाठी धोका ठरला आहे, असे ‘आयसीएमआर’च्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.