केनियामध्ये स्थानिक नागरिकांकडून चिनी व्यवसायिकांच्या विरोधात आंदोलन !
‘चिनी नागरिकांनो, चालते व्हा’च्या घोषणा !
नैरोबी (केनिया) – केनियाच्या जनतेने चिनी व्यपार्यांच्या विरोधात आंदोलन चालू केले आहे. सहस्रो नागरिक रस्त्यावर उतरून ‘चायनीज मस्ट गो’ (चिनी नागरिकांनी येथून चालते व्हावे !) लिहिलेले फलक घेऊन घोषणा देत आहेत. स्थानिक व्यापार्यांनी चिनी व्यावसायिकांना देश सोडण्यास सांगितले आहे.
कीनिया में चीन के ट्रेडर्स के खिलाफ विरोध प्रदर्शन, बैनर पोस्टर लेकर सड़कों पर उतरे हजारों स्थानीय कारोबारी; चाइनीज मस्ट गो के नारे लगाएhttps://t.co/bN9sVnCG0G#China #KenyaProtests
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) March 7, 2023
चिनी व्यापारी आणि आस्थापने स्थानिक व्यापार्यांना संपवण्यासाठी सर्व प्रकारचे डावपेच अवलंबत आहेत. चीनने केनियात ‘चायनीज स्क्वेअर’ नावाने दुकाने उघडली आहेत. स्थानिक बाजाराच्या तुलनेत येथे ४५ टक्क्यांपर्यंत स्वस्तात वस्तू विकल्या जातात. त्यामुळेच येथे सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने येतात. चिनी वस्तू स्वस्त आहेत; पण त्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे. असे असूनही स्वस्त दराच्या जाळ्यात लोक अडकत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापार्यांची मोठी हानी होत आहे. स्थानिक व्यापार्यांना बाजारपेठेतून बाहेर फेकले जावे, यासाठी नियोजनाचा भाग म्हणून चिनी व्यावसायिक हे करत आहे, असे व्यापारी आणि नागरिक यांच्याकडून आरोप केला जात आहे.
संपादकीय भूमिकाचीन ज्या देशात जातो, तेथील अर्थकारण स्वतःच्या कह्यात घेण्याचा प्रयत्न करून त्या देशाची अर्थ व्यवस्था खिळखिळी करतो. केनियामध्ये हेच घडले आहे. भारतात हे घडण्याआधी सरकारने चिनी वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालावी ! |