अरण्येश्वर (पुणे) भागात घरात असलेल्या काळूबाई मंदिरात दागिने आणि पैसे यांची चोरी !
पुणे – अरण्येश्वर भागातील अण्णाभाऊ साठे वसाहतीतील एका घरात असलेल्या श्री काळूबाईदेवीच्या मंदिरातून चोरांनी अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि दानपेटीतील २५ सहस्र रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी राजेश गद्रे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. गद्रे यांचे आई-वडील अण्णाभाऊ साठे वसाहतीमध्ये रहातात. त्यांनी घरात श्री काळूबाईदेवीचे मंदिर स्थापन केले आहे. घराचे कुलूप तोडून चोरांनी आत प्रवेश करून चोरी केल्याचे समजते.
Pune Crime News : काळूबाई मंदिरातून पावणेतीन लाखांचा ऐवज चोरीसhttps://t.co/gNl8Ng8IoK
— mpcnews.in (@PimpriChinchwad) March 7, 2023
संपादकीय भूमिकाहिंदूंची मंदिरे असुरक्षित असणे, हे दुर्दैवी ! |