विद्यार्थिंनी आणि शिक्षिका यांना हिजाब परिधान करणे बंधनकारक
(हिजाब म्हणजे मुसलमान महिलेने डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) )
मुझफ्फराबाद – पाकव्याप्त काश्मीर सरकारने नुकत्यात काढलेल्या एका आदेशात तेथील शाळा आणि महाविद्यालये यांत शिकणार्या विद्यार्थिंनी अन् शिक्षिका यांना हिजाब परिधान करणे बंधनकारक केले आहे. सरकारच्या या आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी देण्यात आली आहे. या आदेशावर सामाजिक माध्यमांद्वारे टीका केली जात आहे. काहींनी या आदेशाची तुलना अफगाणिस्तानातील तालिबानच्या फतव्यांशी केली आहे. अफगाणिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणावर बंदी घालणारा फतवा काढण्यात आला होता.
#Hijab has been made mandatory for female teachers and students in mixed-gender educational institutions in POK. https://t.co/AgZlTWOVMB
— IndiaToday (@IndiaToday) March 7, 2023