पाकिस्तानमध्ये होळी खेळणार्या हिंदु विद्यार्थ्यांवर आक्रमण : १५ घ्यायाळ
पाकमधील असुरक्षित हिंदू !
लाहोर- पाकमधील कट्टरतावादी इस्लामी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी पंजाब विद्यापिठात होळी खेळणार्या हिंदु विद्यार्थ्यांवर आक्रमण केले. या आक्रणात १५ हिंदु विद्यार्थी घ्यायाळ झाले. या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.
Hindu students attacked by Islamists in Pakistan for celebrating Holi.
Similar incidents of attacks on Holi celebrations happen in India every year.
Secular cowardice cost Hindus more than Islamist violence.pic.twitter.com/nGpuCXuFRP
— Pakistan Untold (@pakistan_untold) March 6, 2023
पंजाब विद्यापिठाच्या विधी महाविद्यालयामध्ये होळी साजरी करण्यासाठी ३० हिंदु विद्यार्थी एकत्र आले होते. ‘इस्लामी तमियत तुलबा’ (आयजेटी) या इस्लामी संघटनेच्या धर्मांध कार्यकर्त्यांनी त्यांना होळी साजरी करण्यापासून बलपूर्वक रोखले. यामुळे हाणामारी झाली. या हाणामारीत १५ हिंदु विद्यार्थी घ्यायाळ झाले. होळी साजरी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची अनुमती घेतल्याचे हिंदु विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. ‘कुलगुरूंनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत’, असे पंजाब विद्यापिठाचे प्रवक्ते खुर्रम शहजाद यांनी सांगितले.
सौजन्य : zee 24 taas