सिंधुदुर्ग : असलदे येथे २ मंदिरांत चोरी, तर शाळेत चोरीचा प्रयत्न
कणकवली – तालुक्यातील असलदे येथील श्री रामेश्वर मंदिर आणि डामरेवाडी येथील श्री साईमंदिर येथील दानपेटी फोडून चोरी करण्यात आली, तसेच गावठाण, असलदे येथील प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीतील कपाट तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. ६ मार्च या दिवशी शिक्षक आणि विद्यार्थी शाळेत आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे चोरांनी शाळेच्या एका वर्गखोलीत मद्य पिऊन बाटल्या तेथेच टाकल्या होत्या. ही घटना समजताच सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बाबाजी शिंदे, पोलीस पाटील सावित्री पाताडे, ग्रामपंचायत सदस्य आनंद घाडी, अनिल नरे, मेहुल घाडी, श्यामू परब यांच्यासह ग्रामस्थ घटनास्थळी आले.
संपादकीय भूमिकाहिंदूंची असुरक्षित मंदिरे ! |