सोलापूर येथे कांदा प्रश्नावर जनहित संघटनेचे पालकमंत्र्यांसमोर आंदोलन !
पालकमंत्री विखे पाटील यांनी निवेदन न स्वीकारल्याने संतप्त आंदोलकांची घोषणाबाजी
सोलापूर – सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत येथील जिल्हा नियोजन भवन येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कांदा उत्पादक शेतकर्यांना अनुदान देण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला; मात्र विखे पाटील हे निवेदन न स्वीकारता गेले.
यामुळे संतप्त झालेले प्रभाकर देशमुख आणि शेतकरी यांनी विखे पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या प्रकरणी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैय्यासाहेब देशमुख यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात आला.