‘लोकसेवा फाऊंडेशन’च्या पुढाकाराने हिंदु देवतांच्या ४ सहस्रांहून अधिक प्रतिमांचे विधीवत् अग्निसमर्पण !
बेळगाव येथील घटना
बेळगाव – शहरातील विविध भागांत, रस्त्याच्या शेजारी, झाडाखाली, मंदिर परिसरात ठेवण्यात आलेल्या हिंदु देवतांच्या ४ सहस्रांहून अधिक प्रतिमा एकत्र करून ‘लोकसेवा फाऊंडेशन’च्या पुढाकाराने त्यांचे बसव कॉलनी परिसरात विधीवत् अग्निसमर्पण करण्यात आले. या प्रसंगी ‘फाऊंडेशन’चे अध्यक्ष वीरेश हिरेमठ, उपमहापौर रेश्मा पाटील, महादेवी हिरेमठ, बाळू कणबरकर, गजानन पाटील, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उज्ज्वला गावडे उपस्थित होत्या.
प्रारंभी या प्रतिमांच्या काचा बाजूला काढून सर्व प्रतिमा एकत्र करून त्यांचे विधीवत् पूजन करण्यात आले आणि नंतर त्यांचे अग्निसमर्पण करण्यात आले. (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने देवतांच्या जीर्ण झालेल्या प्रतिमा अग्निसमर्पित कराव्यात अथवा नदी-समुद्रात विसर्जित कराव्यात, हे ज्ञात नसल्याने ते देवालय, झाड अशा ठिकाणी त्या ठेवून देतात. यावरून हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती अपरिहार्य आहे ? ते लक्षात येते ! – संपादक)