जगातील ५० सर्वोत्तम ‘सँडविच’च्या सूचीत वडापाव १३ व्या स्थानी !
मुंबई – येथील रस्त्यारस्त्यांवर मिळणार्या वडापावला जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील ५० सर्वोत्तम ‘सँडविच’च्या सूचीत वडापावला १३ व्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. ‘टेस्ट अॅटलस’ या ‘जागतिक फूड ट्रॅव्हल गाईड’ने हे सर्वेक्षण केले आहे. या सूचीत तुर्कीचे ‘टॉम्बिक सँडविच’ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसर्या क्रमांकावर पेरूचे ‘बुटीफारा सँडविच’ आणि अर्जेंटिनाच्या ‘डी लोमो सँडविच’चा तिसरा क्रमांक आहे.