मालाड (मुंबई) येथे अज्ञाताकडून मदर मेरीच्या पुतळ्यावर दगडफेक !
मुंबई – मालाड पश्चिमकेडील मदर मेरीच्या पुतळ्यावर एका अज्ञाताने दगडफेक करून काचेचे कवच फोडले. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. सीसीटीव्हीच्या साहाय्याने शोध घेतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. अज्ञाताला अटक करण्यात आली आहे.
आरोपी मुंबईत चित्रपटसृष्टीत नोकरी करण्यासाठी आला होता; पण त्याळात आई आणि भाऊ यांचे निधन झाले. आर्थिक अडचणींमुळे तो त्यांच्या अंत्यविधींनाही उपस्थित राहू शकला नाही. काम मिळत नसल्याने त्याने चायनीज गाडीवर काम चालू केले; पण चित्रपटात काम न मिळाल्याच्या नैराश्यातून त्याने वरील प्रकार केला. याआधी त्या मदरमेरीची पूजाही केली होती; पण तरीही काही न झाल्याने त्याने वरील प्रकार केला.